Special Report | राज ठाकरेंना दौरा स्थगित करण्याची वेळ का आली?-TV9
17 एप्रिलला मनसे अध्यक्षांनी अयोध्येला जाऊन रामलल्लांचं दर्शन घेण्याची घोषणा केली खरी...पण 34 व्या दिवशी राज ठाकरेंना आपल्या दौऱ्याला स्थगिती देण्याची वेळ आली...
17 एप्रिलला मनसे अध्यक्षांनी अयोध्येला जाऊन रामलल्लांचं दर्शन घेण्याची घोषणा केली खरी…पण 34 व्या दिवशी राज ठाकरेंना आपल्या दौऱ्याला स्थगिती देण्याची वेळ आली…
उत्तर भारतीयांचा मुद्दा हाती घेत, 2008 मध्ये राज ठाकरेंच्या एका आदेशावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जी मारहाण केली. त्यावरुन भाजपचे खासदार बृजभूषण सिंह माफीवर ठाम राहिले.. बृजभूषण सिंह माफीची मागणीही करत होते..आणि बोचरी टीकाही करत होते..पण मनसेचे प्रवक्ते असो की नेते, शांतच राहिले. बृजभूषण सिंहांवर राज ठाकरेच बोलतील असं मनसेचे नेते सांगत राहिले. आता पुण्यात सभाच असल्यानं, राज ठाकरे त्यांच्यावर बोलतील अशी अपेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांना आहे…पण मनसेचे नेते का बोलत नव्हते, हे वसंत मोरेंच्या व्हायरल क्लीपमधून सहज लक्षात येते. राज ठाकरेंनी बोलण्यापासून रोखल्याचं या क्लीपमध्ये मोरे सांगतायत.
आता राज ठाकरेंनी दौरा स्थगित केल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपमांनीही, राज ठाकरेंकडे माफीची मागणी केली. तसंच राज ठाकरे आता हिंदूत्व सोडणार का ?, असा खोचक सवालही निरुपमांनी केलाय…तर भाजप काही लोकांना वापरुन घेतंय, त्यामुळं लवकरच शहाणपण काहींना आलं तर बरं होईल असा चिमटा संजय राऊतांनीही काढलाय. भोंग्याचा मुद्दा हाती घेतल्यापासून अजित पवारही राज ठाकरेंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. आपला दौरा स्थगित करताना, राज ठाकरेंनी तूर्तास हा शब्द वापरलाय..त्यामुळं राज ठाकरे अयोध्येला कधी जाणार आणि ती नवी तारीख काय असेल हे राज ठाकरेच रविवारच्या सभेत सांगतील.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

