Special Report | फेब्रुवारीपर्यंत मुंबई ओमिक्रॉनमुक्त होणार?

देशातल्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा रोज मोठा येतोय. मात्र देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन्ही शहरात कोरोनाचे आकडे कमी होतायत. मुंबईत सलग 10 दिवसांपासून रुग्णवाढीला ब्रेक लागतोय आणि दिल्लीतही 7 दिवसांपासून नव्या रुग्णांत घट आलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 17, 2022 | 9:57 PM

देशातल्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा रोज मोठा येतोय. मात्र देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन्ही शहरात कोरोनाचे आकडे कमी होतायत. मुंबईत सलग 10 दिवसांपासून रुग्णवाढीला ब्रेक लागतोय आणि दिल्लीतही 7 दिवसांपासून नव्या रुग्णांत घट आलीय.

7 जानेवारीला मुंबईत 20971 रुग्ण आले. त्या दिवशी टेस्टिंग होतं 72442. 9 जानेवारीला 19474 रुग्ण, टेस्टिंग होतं 68249. 10 जानेवारीला 11647 रुग्ण, टेस्टिंग होत्या 62 हजार. 13 जानेवारीला 13702 रुग्ण, टेस्ट होत्या 63 हजार 31. 15 जानेवारीला 10661 रुग्ण आले, टेस्ट झाल्या 54558. आणि 16 जानेवारीला मुंबईत तिसऱ्या लाटेतले सर्वात कमी म्हणजे 7985 रुग्ण आले, त्यादिवशी टेस्ट होत्या 57534.

दिल्लीतही 22 हजारांवरुन रोजची रुग्णसंख्या आता 18 हजारापर्यंत आलीय. काही जाणकारांच्या मते मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही शहरं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून बाहेर येऊ लागली आहेत. म्हणजे कोरोनाच्या लाटेच्या पिकमधून ही दोन्ही शहरं निघून गेलीयत. जर हा अंदाज खरा ठरला, तर मुंबईतली रुग्णसंख्या पुढच्या 15 दिवसात 1 हजारांच्या आसपास खाली यायला हवी. पहिली लाट केरळातून सुरु झाली आणि पंजाबमध्ये जाऊन संपली. दुसरी लाट अमरावतीतून सुरु झाली, आणि सर्वात शेवटी त्या लाटेचा प्रभाव पश्चिम बंगालमध्ये कमी झाला. तसंच यावेळी मुंबई-दिल्लीतून सुरु झालेली तिसरी लाट दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा अंदाज आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें