मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर की संपावर? काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल अन् अब्दुल सत्तार म्हणाले…
VIDEO | राज्यातील सत्तांतरानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचनाक तीन दिवसाच्या सुट्टीवर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसाच्या सुट्टीवर गेलेत. मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे २४ ते २६ एप्रिलपर्यंत नेमके सुट्टीवर का गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस सुट्टीवर गेल्यानं विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर की संपावर?, असा खोचक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. तर या खोचक सवालावर शिवसेना नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या टीकेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री गावी गेलेत त्यांनी सुट्टी घेतली नाही.’ तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेवर स्वतः प्रत्युत्तर दिले आहे, मी कधीही सुट्टीवर जात नाही तर मी डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये, असे म्हणत ठाकरे गटासह नाव न घेता उद्धव ठाकरे यांना देखील सुनावल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Apr 26, 2023 10:33 AM
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
