Local Body Poll : महापालिका अन् ZP निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष
राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील २९ महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याने, आज महत्त्वाच्या तारखांची घोषणा अपेक्षित आहे.
राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी ४ वाजता महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रकार परिषदेत राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गेल्या काही महिन्यांपासून सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२३ पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम घोषित केला जाऊ शकतो. सायंकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही पत्रकार परिषद होईल, अशी माहिती मिळाली आहे. यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून असलेली निवडणुकीची उत्सुकता आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या घोषणेने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग

