उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक

उल्हासनगर येथे श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांच्या कार्यालयावर दगडफेक (stone pelting) झाल्याची घटना समोर येत आहे. पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. ठिकठिकाणी शिसैनिक आक्रमक होत असल्याचे वृत्त आहे. राज्यभरामध्ये शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुर्ला, साकीनाका आणि पुणे येथेही दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय […]

नितीश गाडगे

|

Jun 25, 2022 | 3:54 PM

उल्हासनगर येथे श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांच्या कार्यालयावर दगडफेक (stone pelting) झाल्याची घटना समोर येत आहे. पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. ठिकठिकाणी शिसैनिक आक्रमक होत असल्याचे वृत्त आहे. राज्यभरामध्ये शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुर्ला, साकीनाका आणि पुणे येथेही दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात येत असलेले बॅनर फाडल्याच्या घटनासुद्धा घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले असून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया राज्यभरात उमटत असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता थेट आरोप-प्रत्यारोप होत आहे. राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें