यंदाचा अर्थसंकल्प हा कटपेस्ट आणि फसवा आहे – सुधीर मुनगंटीवार
राज्यांचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) आज सादर झाल्यांतर राज्याच्या राजकारणात जोरदार खडाखडी सुरू झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाला 'कट पेस्ट' असं म्हटलं आहे.
मुंबई : राज्यांचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) आज सादर झाल्यांतर राज्याच्या राजकारणात जोरदार खडाखडी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar) हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगितले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis)या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाला ‘कट पेस्ट’ असं म्हटलं आहे. “हा कटपेस्ट अर्थसंकल्प आहे. वैश्विक महामारीनंतर आलेला हा अर्थसंकल्प होता. अपेक्षा खूप होत्या. पण अपेक्षा पूर्ण करण्यास हे सरकार अपयशी ठरलंय. किती फसवणार तुम्ही? यातून फारसं काही निघेल असं वाटत नाही. एखाद्याला जेवायला बोलवायचं आणि लोणचं-मीठ ठेवून काम भागवायचं, असा हा सगळा प्रकार आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो

