AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2022 : शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, विमानतळाची मोठी घोषणा

राज्यातल्या विमान वाहतुकीसाठीही (Transport budget 2022) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याच शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे.

Maharashtra Budget 2022 : शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, विमानतळाची मोठी घोषणा
बजेटमधील चौथे सूत्रImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 11, 2022 | 3:34 PM
Share

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022) सादर झाला आहे. यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी राज्यातल्या विमान वाहतुकीसाठीही (Transport budget 2022) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याच शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. यात शिर्डी विमानतळासाठी 150 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीसाठी तसेच रात्रीच्या वाहतुकीच्या कामासाठ हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे राज्याल्या माल वाहतुक आणि इतर वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.

विमानतळासाठी मोठ्या घोषणा

कोणत्या विमनातळासाठी किती कोटी?

  1. शिर्डी विमानतळावरून मालवाहतूक आणि रात्रीची वाहतूक सुरू होणार, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  2. शिर्डी विमानतळाच्या विकास कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
  3. रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि भूसंपादनासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  4. अमरावती विमानतळावरून रात्रीची उड्डाणे, नवीन टर्मिनलची उभारणी आणि धावपट्टीचे रुंदीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  5. कोल्हापूर विमानतळासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
  6. गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे.
  7. राज्यातील उद्योगांंना चालना देण्यासाठी नवीन विमानतळे आणि विमानतळांचा विस्तार हा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
  8. नवीन विमानतळांमुळे वाहतुकीचे जाळे आणखी मजवूत होणार आहे.
  9. महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.
  10. विमान वाहतुकीच्या जाळ्याने महाराष्ट्र देश-विदेशाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे.

Maharashtra Budget : कोरोनानं महाराष्ट्राचा कणा ढिला केला, आरोग्य योजनांसाठी 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प सादर

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा