AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget : कोरोनानं महाराष्ट्राचा कणा ढिला केला, आरोग्य योजनांसाठी 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

महाराष्ट्राचं आगामी 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज त्यांनी सादर केला. त्यातील आरोग्य विभागासाठीच्या दहा महत्वाच्या घोषणा पुढील प्रमाणे-

Maharashtra Budget : कोरोनानं महाराष्ट्राचा कणा ढिला केला, आरोग्य योजनांसाठी 10 मोठ्या घोषणा कोणत्या?
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवारImage Credit source: महाराष्ट्र विधानसभा
Updated on: Mar 11, 2022 | 3:08 PM
Share

मुंबईः मागील दोन वर्षांपासून कोरोनानं (Covid-19) महाराष्ट्राचा कणा अक्षरशः खिळखिळा केला आहे. आरोग्य व्यवस्थेवर एवढं मोठं संकट अद्याप कधीही आलं नव्हतं. विविध शहरांसह ग्रामीण भागात अपुऱ्या आरोग्य सुविधा असलेल्या महाराष्ट्रानं या संकटालाही धीरानं तोंड दिलं. मात्र आता पुन्हा अशा महामारींपासून बचावासाठी एक सक्षम आरोग्ययंत्रणा उभी केली पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडून (Maharashtra Budget) व्यक्त केली जात होती. राज्यातील जनतेच्या या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज काही मोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्राचं आगामी 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज त्यांनी सादर केला. त्यातील आरोग्य विभागासाठीच्या दहा महत्वाच्या घोषणा पुढील प्रमाणे-

  1.  नियमित अर्थसंकल्पाव्यतिरिक्त राज्यातील आरोग्य सुविधांवर करणार 3 हजार 111 कोटींचा निधी खर्च केला जाईल. आरोग्य संस्थ्यांच्या श्रेणीवर्धन बांधकामाकरिता मागील वर्षी 7 हजार 500 कोटींचा प्रकल्प जाहीर केला होता. या प्रकल्पासाठी हुडकोकडून 3 हजार 948 कोटींचं कर्ज घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 22-23 मध्ये या प्रकल्पाला हुडकोकडून 2 हजार कोटी आणि 15 व्या वित्त आयोगाकडून 1 हजार 313 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
  2. मुंबई शहराबाहेर प्रथम दर्जाची शासकीय ट्रॉमा केअर युनिट नसलेल्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. यात नांदेड, अमरावती, जालना, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी 100 कोटी आणि इतर खर्चासाठी 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
  3.  ग्रामीण भागातील रुग्णालयातील रुगणांना शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथेक्रिप्सी उपचार उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षात ही उपचार पद्धती सुरु करण्याचे प्रस्तावित असून त्याकरिता 17 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.\
  4. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात फेको ही आधुनिक उपचार पद्धती सुरु करण्याचे शासनाने ठरवले आहे. एकूण  60 रुग्णालयात ही थेरपी सुरु केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. राज्यातील 50 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्र आणि 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता संयंत्र देण्यात येणार आहे.
  5. कर्क रुग्णांवर वेळेत निदान उपचार होण्याकरिता, 8 आरोग्यमंडळांसाठी 8 मोबाइल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  6.  टाटा कँसर रिसर्च व हॉस्पिटलला आयुर्वेदिक रुग्णालय आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी रायगड जिल्ह्यात १० हेक्टर जमीन दिली जाईल. महानगरातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शिवारोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेली मेडिसीन केंद्र स्थापन करण्यात येईल. पुढील टप्प्यात ही सेवा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत विस्तारीत करण्यात येईल.
  7. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिषु रुग्णालयांची स्थापना होईल. हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड, येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येतील. अकोला आणि बीड येथे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम व श्रेणी वर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे.
  8. 2021-22 या वर्षात रुग्णखाटांची क्षमता 1200 कोटींने वाढून विशेष उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात 49 रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती व इतर कामासाठी 1,392  कोटी11 लाख रुपये किंमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
  9. जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2022-23 या वर्षात आरोग्य विभागात कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3 हजार 183 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
  10.  वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावे, याकरिता पदव्युत्तर शिक्षण क्षमतेत वाढ कऱण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबई येथे, सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान वैद्यकीय शिक्षण संस्था तर नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहे.

इतर बातम्या-

अर्थमंत्री, मुख्यमंत्री विधानभवनात दाखल, थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार

संजय राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा : किरीट सोमय्या

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.