Sunetra Pawar | बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिया, ‘तुम्ही माझी जबाबदारी…’
महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असताना बारामती विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

या दणदणीत विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. या वेळी त्या म्हणाल्या, ‘बारामतीकरांनी या निवडणुकीत दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना श्रद्धांजली आहे,’ असं सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच ‘हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची..!’ असं म्हणत सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना विकासाचा विश्वास दिला आहे.
पुढे सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘बारामतीकरांनी हा विश्वास दाखवला याचा आनंद आहे, तुमच्या या मतांनी माझी जबाबदारी वाढवली आहे. मी बारामतीच्या विकासासाठी तत्पर असेन.’
Published on: May 04, 2026 03:42 PM
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..