Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, मी राज्यसभेवर…
महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवारांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि राजीनामा सुपूर्द केला. यानंतर एका वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला. विजयानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे, म्हणून त्यांना खासदार हे पद सोडावे लागणार आहे. तर आता खासदार या पदावर छगन भुजबळ यांना संधी मिळणार का, या चर्चांनी जोर धरला होता, यावर आता थेट छगन भुजबळ यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
छगन भुजबळ आधीपासूनच राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते असं सागितल जात होतं. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत भुजबळांनी स्वतः याबबात वक्तव्य केलं. भुजबळ म्हणाले, ‘माझा राज्यसभेवर जाण्याचा काही आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.’
Published on: May 07, 2026 01:49 PM
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...