Sunil Raut | ‘जे.पी नड्डा गॉडफादर आहे का देशाचा? तो सांगणार आणि शिवसेना संपणार? सुनील राऊत
ईडीनं ड्रामेबाजी करून संजय राऊतांवर गुन्हा दाखल केलाय. संजय राऊतांनी पैसा नाही शिवसैनिकांचं प्रेम कमावलं आहे. ईडीनं खोटी कागदपत्र दाखल केली. 40 जण पैसे घेवून बाहेर गेलेले आहेत. संजय राऊत झुकले नाही म्हणून त्यांना अटक झाली असं सुनीला राऊत म्हणाले.
मुंबई : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा(J. P. Nadda) यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. या भाषमात त्यांनी देशात केवळ भाजपच राहणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय. भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही असं म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला. यावर संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत(Sunil Raut) यांनी प्रतिक्रिया दिलेय. ईडीनं ड्रामेबाजी करून संजय राऊतांवर गुन्हा दाखल केलाय. संजय राऊतांनी पैसा नाही शिवसैनिकांचं प्रेम कमावलं आहे. ईडीनं खोटी कागदपत्र दाखल केली. 40 जण पैसे घेवून बाहेर गेलेले आहेत. संजय राऊत झुकले नाही म्हणून त्यांना अटक झाली. उद्धव ठाकरेनी आमचा कुटुंबियासोबत असल्याचा दिलासा आहे. सामनाचे अग्रलेख तसाचं निघणार आहे. जेपी नड्डा कुठला गाँडफादर आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

