Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM
राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 25 टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी काढले आहेत.
राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 25 टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी काढले आहेत. शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता 1 डिसेंबरपासून 100 टक्के सुरू होतील, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता.
पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये 50 टक्केच परवानगी असल्याने महापालिका काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कोरोनाचे निर्बंध, शर्ती वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी 48 तास आधी पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
