AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 15 October 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 15 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 8:53 AM
Share

लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमला मोठे खिंडार पडले आहे. एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पाचही विद्यमान नगरसेवकांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे एमआयएमला हा मोठा धक्का मानला जात आहे.

लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते. एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला.

Published on: Oct 15, 2021 08:53 AM