… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत दिसले असते; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात. त्यावेळेस ते संयमाने वागले असते तर शिवसेनेचे 56 आमदार आज भाजपसोबत दिसले असते. (gulabrao patil slams bjp leader chandrakant patil)

... तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत दिसले असते; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
gulabrao patil

पंढरपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात. त्यावेळेस ते संयमाने वागले असते तर शिवसेनेचे 56 आमदार आज भाजपसोबत दिसले असते, असा जोरदार टोला शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

गुलाबराव पाटील यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपा नेते चंद्रकांत पाटलांवर टीका केली. कोरोनाचे संकट कमी झाल आहे. आता कायमस्वरूपी हे कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले. जळगावमध्ये भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. याविषयी पाटील यांना विचारले असता, भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत आहे. त्यामुळेच हे नगरसेवक आता भाजपकडे जाताना दिसत आहेत, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

पॅकेज अपुरे

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अपुरे असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली

दरम्यान, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त केली. ही मदत तुटपुंजी असल्याची टीका करत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असं ते म्हणाले. राज्य सरकारने जिरायती भागासाठी 10 हजार प्रति हेक्‍टर व बागायती भागासाठी 15 हजार रुपये प्रतिहेक्‍टर रुपये मदत जाहीर केली आहे.

10 हजार कोटींचे पॅकेज

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.

मदतीचं स्वरुप नेमकं कसं असेल?

जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Nagpur | नागपुरात दीक्षाभूमी परिसरात भीम आर्मीचं आंदोलन

“घुसखोरी थांबवा नाहीतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल”, गृहमंत्री अमित शाहांचा पाकिस्तानला इशारा

(gulabrao patil slams bjp leader chandrakant patil)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI