SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 25 October 2021

आमदार सुहास कांदे यांनी राऊत यांच्यासमोर आपले दुःख मांडले. आमदार कांदे म्हणाले, राऊत साहेब आपणच वाली आहात. आम्ही आमचं दुःखं कोणाकडे मांडायचं (असं म्हणत छगन भुजबळ यांना टोला हाणला). मी भुजबळ यांच्या मुलाला पाडलं म्हणून बोलत नाही. ते मला सावत्र मुलासारखं करतात. आम्ही कोणाकडे जाणार. तुमच्याकडेच मागणार आणि आता निधी दिला नाही तर अख्खी DPDC घेऊन येणार असा इशाराही दिला.

नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले, ते फक्त सुहास कांदे आमदार असल्यामुळे. त्यामुळे छगन भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडवा, असा सल्ला रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देत पुन्हा एकदा कांदेंच्या पाठीवर थाप मारली.

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राऊत रविवारी नांदगाव मतदार संघात होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांनी राऊत यांच्यासमोर आपले दुःख मांडले. आमदार कांदे म्हणाले, राऊत साहेब आपणच वाली आहात. आम्ही आमचं दुःखं कोणाकडे मांडायचं (असं म्हणत छगन भुजबळ यांना टोला हाणला). मी भुजबळ यांच्या मुलाला पाडलं म्हणून बोलत नाही. ते मला सावत्र मुलासारखं करतात. आम्ही कोणाकडे जाणार. तुमच्याकडेच मागणार आणि आता निधी दिला नाही तर अख्खी DPDC घेऊन येणार असा इशाराही दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI