सुपरफास्ट 50 न्यूज, राज्याच्या शहरी, ग्रामिण आणि राजकीय अशा महत्वाच्या बातम्यांचा आढावा

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 07, 2023 | 3:37 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते मातोश्रीला सुरूंग लावण्याचे काम करत आहेत. जर वेळ मिळाला तर उद्धव ठाकरे यांना भेटून राऊतांचे कारस्थान सांगणार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले आणि शिंदे-फडणवीस सरकारची डेट लाईनच सांगितली. संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सुप्रीम कोर्टाने हे व्हेंटिलेटर काढलं की सरकारचं राम नाम सत्य है होईल, असं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते मातोश्रीला सुरूंग लावण्याचे काम करत आहेत. जर वेळ मिळाला तर उद्धव ठाकरे यांना भेटून राऊतांचे कारस्थान सांगणार.

तर बारामतीत अजित पवार यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. स्वराज्य रक्षक वादानंतर ही घोषणाबाजी झाली.

काल नाशिकमध्ये ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज रत्नागिरीत ५० कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI