कोणीही कितीही बदमाशी केली तरी, हे सरकार…; शिंदे-फडणवीस सरकारवर राऊत यांचा घणाघात
यावनरून खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल करताना, नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाप्रमाणे त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय द्यावा लागेल असे म्हटलं आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. तर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. त्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यावनरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल करताना, नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाप्रमाणे त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय द्यावा लागेल असे म्हटलं आहे. तर कोणीही कितीही बदमाशी केली तरी सर्वोच्च न्यायालयाची जी रचना आहे ती डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही असे म्हणत टीका केली आहे. तर हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार. या सरकारचा मृत्यू अटळ असल्याचं म्हणत बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका तुम्ही अडचणीत याल असे आवाहन अधिकारी आणि पोलिसांना केलं आहे.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

