‘आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
अजित पवार यांनी सांगलीतील तासगाव येथील सभेत काल राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मोठे आणि गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली.
आर. आर. पाटील यांच्याबद्दलचं अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आर. आर. पाटील यांच्याबद्दलचं अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तर आर. आर. पाटील यांच्या कुटुंबीयांची मी माफी मागितली असंही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. ‘माझे जेष्ठ बंधू आर. आर. पाटील यांच्याबद्दल अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अस्वस्थ करणारं आणि वेदना देणारं होतं. खरंतरं मी वहिनींना फोन केला आणि माफी मागितली. कारण वहिनींना आबांच्या आईंना अजित पवार यांच्या वक्तव्याने किती दुःख झालं असेल. गेलेल्या माणसाबद्दल ज्या असंवेदनशीलपणे हे वक्तव्य आलंय. मला आश्चर्य वाटलं आणि दुःखही वाटलं. खरंच अस्वस्थ करणारं हे वक्तव्य होतं. राजकारण या पातळीला गेलंय का? ‘, असा सवालही त्यांनी केला.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

