Supriya Sule | मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर दाखल, भेटीचं कारण…
सध्या राजकारणात विविध भेटीगाठींच्या चर्चांना वेग आला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रिया सुळे या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.
सध्या राजकारणात विविध भेटीगाठींच्या चर्चांना वेग आला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रिया सुळे या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आधीच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. याच दरम्यान सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर दाखल झाल्याचं समोर आलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी सुप्रिया सुळेंसह सदानंद सुळेदेखील उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या मुलीचं काही दिवसांवर लग्न आहे, त्यामुळे निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेले आहेत की या भेटीचं नेमकं कारण काही वेगळं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Published on: Apr 25, 2026 01:12 PM
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...

