मुंडे भेटीवरून षडयंत्र रचणारा बीडचा ‘तो’ नेता कोण? सुरेश धस स्पष्टच म्हणाले, 100 टक्के मुख्यमंत्र्यांकडे…
मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतच्या भेटीवरून बदनामीचे षड्यंत्र रचणाऱ्या धसांनी शोधून काढला. हा नेता बीडचा आहे, त्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असं धस यांनी म्हटलंय.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतच्या भेटीवरून आपल्या बदनामीचा जे षड्यंत्र रचलं, त्यामागे बीडचाच एक मोठा नेता असून त्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले. भेट तीस दिवसांच्या आधीच झाली. पण त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या तब्येतीवरून विचारपूस करण्यासाठी चार ते पाच दिवसांच्या आधीच भेटलो. या दोन्ही भेटींची सांगड घालून बदनामीचं षड्यंत्र रचल्याचा आरोप धसांनी केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच धस आणि मुंडे यांच्या भेटीची बातमी माध्यमांना दिली. मनभेद दूर करण्यासाठी आपण जेवणासाठी दोघांना बोलावलं होतं, चार ते साडेचार तास भेट झाली असं बावनकुळे म्हणाले. मात्र ही भेट वीस ते तीस मिनिटांची होती. बावनकुळेनी साडेचार तास शब्द वापरल्याने संभ्रम निर्माण झाला असं धस यांचं म्हणणं आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धसांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पण तेच धस मुंडेनाच भेटल्यामुळे विरोधकांनी धसांवरच सेटिंगचा आरोप केला. आता सुप्रिया सुळे यांनीसुद्धा सुरेश धसांना टोला लगावत आपण कुणाला भेटणार नाही आणि कॉम्प्रोमाईझचा विषयच नाही असं म्हटलं. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला लढा सुरू राहणार असं धसांनी म्हटलं. मात्र या भेटीवरून बदनामीचं जे षड्यंत्र रचलं, त्यावरून बीडच्या नेत्याचं नाव मात्र धसांनी अद्याप घेतलं नाही. आता तो नेता नेमका कोण यावरून धसांनी सस्पेन्स मात्र वाढवलाय.

मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल

फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं

'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल

खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
