पंकजा मुंडे यांच्या भाषणावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपात प्रचंड दुफळी…”
भाजपात प्रचंड दुफळी माजली आहे, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर भाजपाच पंतप्रधान नरेंद्र मोदी की अमित शाह असा संघर्ष सुरु आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी माझे नेते अमित शाहांची भेट घेऊन मनमोकळपणानं बोलणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पुणे: भाजपात प्रचंड दुफळी माजली आहे, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर भाजपाच पंतप्रधान नरेंद्र मोदी की अमित शाह असा संघर्ष सुरु आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझे नेते अमित शाहांची भेट घेऊन मनमोकळपणानं बोलणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा मुंडे यांचं हे वाक्य फार बोलकं आहे. याचा अर्थ असा आहे की, भाजपाच प्रचंड दुफळी माजलेली आहे. भाजपमध्येच आता अमित शाह की पंतप्रधान मोदी असा संघर्ष तयार झालेला आहे. महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, पंकजा मुंडे यासह अनेक नेते अमित शहा यांच्या छावणीत गेले आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

