…म्हणून पंकजा मुंडे अमित शाह यांना भेटणार; सुषमा अंधारे यांची पंकजा मुंडे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया

Sushma Andhare on Pankaja Munde : पंकजा मुंडे अमित शाह यांना का भेटणार?; सुषमा अंधारे यांची सविस्तर प्रतिक्रिया...

...म्हणून पंकजा मुंडे अमित शाह यांना भेटणार; सुषमा अंधारे यांची पंकजा मुंडे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 2:41 PM

पुणे : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा काल स्मृतीदिन होता. त्यानिमित्त गोपीनाथ गडावरून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपण अमित शाह यांना भेटणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. ओडिसामधल्या अपघातावरून सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय.

पंकजाताई अमित शहा यांना भेटणार असं म्हणत आहेत. भाजपमध्ये सध्या दुफळी निर्माण झाली आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात नेते कोण आहे यावरून दुफळी निर्माण झालीय. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, पंकजा मुंडे यासह अनेक नेते अमित शहा यांच्या छावणीत गेले आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

“मोदीजी, राजीनामा द्या”

ओडिसामध्ये झालेल्या अपघातावरही अंधारेंनी भाष्य केलं आहे. कालच्या रेल्वे अपघातानंतर नंतर काही व्हीडिओ समोर आले आहेत. विश्वगुरू म्हणून घेत त्यांचे भक्त त्यांची आरती ओवाळत असतात. ते अँब्युलन्स देत नसतील तर ते कसले विश्र्वगुरू? सिग्नल दिले गेले नाहीत म्हणून हा भीषण अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती. 10 लाख रुपये माणसाच्या जीवनाची किंमत नाही, हे मोदी यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. ममता बॅनर्जी यांनी देखील राजीनामा दिला होता. सुरेश प्रभू यांनी देखील राजीनामा दिला होता मग आता का राजीनामा मागितला नाही? मोदींना उद्घाटन, फोटो शूट करायचे असतात तेव्हा मिरवून घेतात. मोदी अभिनय करतात आणि उत्तम मांडणी करू शकतात. पण आताची घटना पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अंधारेंनी केली आहे.

अंधारेंचा भाजपला टोला

मुंबई महापालिका जिंकण्याचा विश्वास भाजपकडून व्यक्त होत आहे. त्यावर, आम्हाला काही आव्हान वाटतं नाही. आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षासाठी बोललं पाहिजे. मुंबई जिंकणं नंतर आधी स्वतःचे उमेदवारी जपा, असं म्हणत अंधारेंनी भाजपला टोला लगावला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भंडाऱ्यात भावी मुख्यमंत्री म्हणत पोस्टर लागलेत. त्यावर कुठल्याही कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं असतं, असं त्या म्हणाल्यात.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.