‘फडतूस’ अन् ‘काडतूस’वरून सुषमा अंधारे यांचा भाजप आणि शिवसेनेवर घणाघात; म्हणाल्या….
संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेमध्ये जे असंख्य मुस्लिम बौद्ध आणि अठरापगड जातीचे विविध धर्माचे संविधानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र आले. त्यांचा विटाळ म्हणून विकृत मानसिकतेच्या लोकांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडलं. त्या लाखो नागरिकांचा त्यांच्या जाती-धर्माचा एका अर्थाने अपमानच केला, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या त्या शब्दाचा उल्लेख करत सुषमा अंधारे भाजपवर बरसल्या आहेत. “छत्रपती शिवरायांच्याबद्दल प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, भगतसिंग कोश्यारी यांनी असभ्य भाषा वापरली. पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. प्रशांत परिचारक यांनी तर शहीद पत्नींच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले इथले लाखो युवक बेरोजगार झाले पण भक्त चकार शब्दांनी बोलले नाहीत. पण फडतूस हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

