विरोधकांवर ‘स्ट्राईक’, तीन दिवसांत १४१ खासदार निलंबित; इतिहासातील मोठी कारवाई
आतापर्यंत इतिहासातील निलंबनाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तीन दिवसात १४१ खासदारांवर धडाधड निलंबनाची कारवाई करण्यात आली
मुंबई, २० डिसेंबर २०२३ : दिल्लीत हिवाळी अधिवेशनाचे तीन दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच आतापर्यंत १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. आतापर्यंत इतिहासातील निलंबनाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तीन दिवसात १४१ खासदारांवर धडाधड निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई का होतेय तर याचं कारण म्हणजे १३ डिसेंबर रोजी तरूणांनी लोकसभेत केलेली घुसखोरी. संसदेची सुरक्षा भेदून दोन जण लोकसभेत शिरले. या दोघांनी संसदेच्या गेटवर स्मोक कँडल पेटवत जोरदार घोषणाबाजी केली. यातील महाराष्ट्राच्या लातूरमधील एक जण आहे. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं आणि चर्चा घडवावी अशी मागणी विरोधकांनी केली आणि ही कारवाई झाली असं म्हटलं जातंय. बघा नेमकं काय घडलं?
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी

