Raigad | हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ-tv9

रायगड येथील हरिहरेश्वरमध्ये एक संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने हरिहरेश्वर समुद्राकडे धाव घेतली आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 18, 2022 | 4:32 PM

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सूरू असताना गेल्या काही दिवसापासून घातपातीच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यानंतर रायगड येथील हरिहरेश्वरमध्ये एक संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने हरिहरेश्वर समुद्राकडे धाव घेतली आहे. यानंतर प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने ही बोट किनारी आणली. तसेच त्याची तपासणी केली असता काही शस्त्रे सापडली आहेत. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. तर ही बोट कोणाची आहे? कोठून आली याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. तर रायगड पोलिसांनी यानंतर हरिहरेश्वरमध्ये हायअलर्ट जारी केला आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें