AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'बळी' कुणाचा कान पिळी? Swapnil Joshi कडून ऐका भन्नाट किस्से! Bali on Amazon Prime

‘बळी’ कुणाचा कान पिळी? Swapnil Joshi कडून ऐका भन्नाट किस्से! Bali on Amazon Prime

| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 6:01 PM
Share

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी’च्‍या जागतिक रीलीजची घोषणा केली. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपट सृष्‍टीमधील सर्वात प्रख्‍यात कलाकार स्‍वप्‍नील जोशी, पूजा सावंत व समर्थ जाधव झळकणार आहेत.

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी’च्‍या जागतिक रीलीजची घोषणा केली. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपट सृष्‍टीमधील सर्वात प्रख्‍यात कलाकार स्‍वप्‍नील जोशी, पूजा सावंत व समर्थ जाधव झळकणार आहेत. प्रतिष्ठित चित्रपटनिर्माता विशाल फ्यूरिया यांचे दिग्‍दर्शन आणि अर्जुन सिंग बराण व कार्तिक डी.निशानदार यांच्‍या ग्‍लोबल स्‍पोर्टस् एंटरटेन्‍मेंट अॅण्‍ड मीडिया सोल्‍यूशन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडद्वारे निर्मित चित्रपट ‘बळी भारतामध्‍ये आणि जगभरातील 240 हून अधिक देश व प्रदेशांमध्‍ये 9 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्‍यास सज्‍ज झाला आहे. चित्रपट ‘बळी’ विधुर, मध्‍यमवर्गीय वडिल श्रीकांतचा (स्‍वप्‍नील जोशी) जीवनप्रवास दाखवतो. त्‍याचा 7 वर्षाचा मुलगा मंदार (समर्थ जाधव) चक्‍कर येऊन पडतो आणि सविस्‍तर निदानासाठी त्‍याला जनसंजीवन हॉस्पिटलमध्‍ये नेले जाते. येथून श्रीकांतच्‍या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळते. परीस्थितीला रोमांचक वळण मिळते, जेव्‍हा मंदार एका रहस्‍यमय परिचारिकेसोबत बोलायला सुरूवात करतो. मंदार, ती परिचारिका हॉस्पिटलच्‍या पडक्‍या भागामध्‍ये राहत असल्‍याचा दावा करतो.

Published on: Dec 08, 2021 05:30 PM