MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न एक महिन्यात सोडवू, Swapnil Lonkar प्रकरणानंतर वडेट्टीवारांचं आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलणार आहोत. राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने लावून धरु आणि एका महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवू असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिलंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केलीय. त्यावरुन भाजप नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. अशावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न एका महिन्यात सोडवण्याचं आश्वासन वडेट्टीवार यांनी दिलंय. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि दु:खद आहे. मी त्या वडिलांशी बोललो. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलणार आहोत. राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने लावून धरु आणि एका महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवू असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिलंय.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

