Switzerland Glacier : डेंजरच…. स्वित्झर्लंडमध्ये हिमकडा कोसळला अन् संपूर्ण गावचं झालं गायब… VIDEO बघताच भरेल धडकी
माणसाने निसर्गाशी केलेल्या वर्तणाचे चित्र आता भयावह होत चालले आहे. जागतिक तापमानवाढीचा परिणाम जगभर दिसून येत आहे. याचा ट्रेलर स्वित्झर्लंडमध्ये पाहण्यात आला. जिथे हिमकडा कोसळल्याने संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले.
स्वित्झर्लंडच्या व्हॅलेस कॅन्टनमध्ये वसलेले ब्लैटेन हे सुंदर डोंगराळ गाव हवामान संकटाने ग्रासले आहे. आल्प्स पर्वतरांगेत असलेल्या ब्लैटेन गावात एका भयानक नैसर्गिक आपत्तीने कहर केला. २८ मे रोजी येथे एका मोठ्या हिमकडेचा एक भाग अचानक कोसळला. हिमकडा कोसळल्याने भूस्खलन झाले. हिमकडा कोसळल्याने संपूर्ण गावचं गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. बर्फ, चिखल आणि खडकांच्या मोठ्या प्रवाहामुळे गावावर मोठं संकट आलं आणि सारं काही वाहून गेलं. स्वित्झर्लंडमध्ये हिमकडा कोसळल्याने ब्लैटेन गाव ९० टक्के उद्ध्वस्त झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवत हानी यामध्ये झालेली नाही. गावातील रहिवाशांचे एका आठवड्यापूर्वीच स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. व्हायरल होणारा बघा व्हिडीओ… तुमच्या काळजात धडकी भरेल..
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत

