Sharad Pawar : दोन्ही पवार कधी एकत्र येणार? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार एका वाक्यात म्हणाले…
'जो तो आपआपला राजकीय फायदा आणि तोटा पाहत असतो प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता तटकरे हे एका गटाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष विलीन व्हावा अशी मागणी असली तरी तो होणार नाही,', असं राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येण्याची चर्चा राज्यात सुरू असताना संजय राऊत यांनी नुकताच खळबळजनक दावा केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचं राऊत म्हणाले. अशातच राष्ट्रवादीतील दोन गट अर्थात अजित पवार आणि शरद पवार एकत्र कधी येणार? असा थेट सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींकडून शरद पवारांनाच करण्यात आला. यावेळी त्यांनी एका वाक्यात उत्तर देत राज्यात सुरू असलेल्या चर्चांना आणखी उधाण आणलंय. ‘मला माहिती नाही’, असं उत्तर शरद पवार यांनी केलंय.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांबाबत नाराजीचा सूर असून जयंत पाटील यांनी सुरू केलेल्या परस्पर निवडीवरून शरद पवारांकडे तक्रार जाणार असही सूत्रांमार्फत कळतंय. तर जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चांवर संजय शिरसाट म्हणाले, जयंत पाटलांचं मन तिथं लागत नाही.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

