Sanjay Raut : दोन्ही पवार एकत्र येण्याला ‘या’ नेत्यांचा खोडा, राऊतांनी थेट नावं घेत उडवली खळबळ
'एकत्र आले तर अध्यक्ष बदलावा लागेल, मग तटकरेंनी काय करायचं हा एक प्रश्न आहे. केंद्रातील मंत्रिपदाचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहत असतो.', संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येण्याची चर्चा राज्यात सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केलाय. अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचं कळतं, असं म्हणत संजय राऊत यांनी हा मोठा दावा केला आहे. अशातच काल पवारांच्या नव्या पिढीला संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला होता. भाजपला गटार असं संबोधत तहान लागली तरी गटाराचे पाणी कुणी पित नाही असं राऊत म्हणाले होते.
तर आज राऊत असं म्हणाले की, ‘शरद पवार यांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष सुरू आहे असे म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असेही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजेत असे ही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते, तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाहीत. म्हणजे मोदी आणि शाह यांच्या मुख्य दुकानासोबत त्यांना त्यांचे छोटे दुकान चालवायचे आहे. जो तो आपआपला राजकीय फायदा आणि तोटा पाहत असतो प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता तटकरे हे एका गटाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष विलीन व्हावा अशी मागणी असली तरी तो होणार नाही, अशी माझी माहिती आहे.’

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...

पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर

आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..

आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
