Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला… दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन आल्याने शनिवारी मध्यरात्री एकच खळबळ उडाली. दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने संपूर्ण यंत्रणा सतर्क केली.

मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा उल्लेख करत ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. या माहितीची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर हॉटेलच्या प्रवेशद्वार, स्विमिंग पूल, विविध हॉल आणि इतर महत्त्वाच्या परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा धमकीचा फोन नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून आल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर मुंबईतील संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.
Published on: Jul 13, 2026 12:25 PM
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका