तामिळनाडूत राजकीय खळबळ! टीव्हीकेला सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके पक्षाचा पाठिंबा? थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर
तामिळनाडूच्या राजकारणात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून, अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती समोर येत आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने राज्यातील प्रस्थापित डीएमके आणि एआयएडीएमकेसारख्या दिग्गज पक्षांना जोरदार धक्का दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता असते. दरम्यान, सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, टीव्हीकेने मित्रपक्षांच्या मदतीने बहुमताचा 118 चा आकडा गाठला असून, राज्यात विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. सीपीआय पक्षाचे राज्यात 2 आमदार निवडून आल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, थलपती विजय हे आज सायंकाळी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तामिळनाडूच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा आता राज्यभर रंगू लागली आहे.
Published on: May 08, 2026 05:16 PM
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन