Thackery Brothers : दोन दशकानंतर एकाच मंचावर ठाकरे बंधू एकत्र, मुद्दा एकच… LIVE बघा वरळी डोममधील तयारी
राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना या विजयी मेळावा आज होतोय. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.
आज पाच जुलै रोजी असणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. आज मुंबईतील वरळी डोम येथे सकाळी दहा वाजता ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणार आहे. विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू आज एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. जवळपास दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
वरळी डोम येथे हा विजयी मेळावा होणार असून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ठाकरे बंधू काय बोलणार? त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द केल्यानंतर आता या मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. बघा कशी आहे वरळी डोममधील तयारी?

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या

मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल

...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा

विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
