ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय जाणार? मोठी अपडेट समोर
ठाकरे गटाला आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालय जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाकरे गटाला आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालय जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार उरले असून, त्यांच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संसदेतील पक्षीय ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
दिल्लीतील संसदेत पक्ष कार्यालय वाटपासाठी खासदारांची संख्या महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे कार्यालय कायम राहणार की ते काढून घेतले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच याबाबत संसदीय पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, शिंदे गटाने खासदारांच्या प्रवेशानंतर आपली ताकद वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणासह दिल्लीतील घडामोडींनाही आता वेग आला आहे.
Published on: Jun 24, 2026 03:17 PM
ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी...

