Ambadas Danve : त्यांच्या अब्रुचे रोजच धिंडवडे निघताय, त्यांना मान… ठाकरेंच्या नेत्यानं शिरसाटांना डिवचलं
तुम्ही बसले कसे, नोटा ठेवताय कशा? त्या बॅगेत नोटा दिसताय तरी आता म्हणताय कपडे होते. स्वतःच्या घरात कोणी कपड्यांच्या बॅगा उघड्या ठेवतात का? असा सवाल करत अंबादास दानवेंनी शिरसाटांवर निशाणा साधला आहे.
संजय शिरसाट यांच्या अब्रुचे रोज धिंडवडे निघताय, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलाय. इतकंच नाहीतर त्यांना काय मान आहे का? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी शिरसाट यांना एकप्रकारे डिवचलंच आहे. तर स्वतःच्या घरातच कपड्याची बॅग उघडी ठेवतात का? असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी केलाय. दरम्यान, आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता. तर पैशांनी भरलेल्या बॅगांसह शिरसाट या व्हिडीओमध्ये दिसताय. यानंतर आज संजय शिरसाटांनी राऊतांनी अब्रुनुकसानीची नोटीस राऊतांना पाठवणार असल्याचे म्हटलं. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

