हा आचारसंहितेचा भंग नाही का? अजितदादांच्या बटण दाबा वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्याचा सवाल
'सत्तेच्या पदावर राहून सत्तेचा दुरपयोग करणं, म्हणजेच आचारसंहितेचा भंग आहे. आमच्याही विभागात तेच चाललंय. आमच्याकडे पुरावे येत असतात. नोटीस द्यायला तेच लावतात आणि मागे घ्यायलाही तेच सांगतात...', ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाला विचारा हा आचार संहितेचा भंग आहे का नाही? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सावंत असेही म्हणाले, सत्तेच्या पदावर राहून सत्तेचा दुरपयोग करणं, म्हणजेच आचारसंहितेचा भंग आहे. आमच्याही विभागात तेच चाललंय. आमच्याकडे पुरावे येत असतात. नोटीस द्यायला तेच लावतात आणि मागे घ्यायलाही तेच सांगतात… लोकं बावळट नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. दहा वर्षांत कोणी त्रास दिला नाही आणि आता आचारसंहिता लागू असताना नोटीस कशी येते? असा सवाल करत शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. हा सगळा गेम आहे, असेही म्हणत त्यांनी घणाघात केलाय. आम्ही इंदापूरकरांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. गावचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी हवा तेवढा निधी देऊ. पण आमच्यासाठीही कचा कचा कचा बटण दाबा, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार आज इंदापुरात प्रचारासाठी आले होते त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं.