'खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

‘खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Nov 07, 2024 | 12:19 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. तर उदय सामंत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीकाही त्यांनी केली.

रत्नागिरीत झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. या सभेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत असून ही सभा कॉर्नर सभा होती असा हल्लाबोल करण्यात आला. यावर बोलताना माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी थेट शिवसेना शिंदे गटाते नेते उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. ‘विरोधक म्हणजे कोण उदय सामंत, उदय सामंत यांना अशा टीवल्या बावल्यांची टीका करण्याची सवय आहे’, असं विनायक राऊत म्हणाले तर खाल्ल्या ताटात घाण करणाऱ्या लोकांमध्ये उदय सामंत यांचं प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल, अशी जिव्हारी लागणारी टीकाही विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर केली. पुढे ते असेही म्हणाले, उदय सामंत यांच्या प्रशस्तीपत्राची आम्हाला गरज नाही पण ज्यांचं खाल्लंय त्यांचे वाभाडे तुम्ही काढताय याची आठवण ठेवावी असं म्हणत रत्नागिरीतही उदय सामंत यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं.चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे उमेदवार असून विधानसभा निवडणुकीत हमखास निवडून येणारे आमदार म्हणून मतदार प्रशांत यादव यांच्याकडे पाहत आहेत. ते नक्कीच विधानसभा निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

Published on: Nov 07, 2024 12:19 PM