संजय शिरसाट यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात, ‘औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर माणूस…’
उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर आर्थिक देवाण-घेवाणीचे आरोप संजय शिरसाट यांनी केले. संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांव ठाकरे गटातील नेत्यानं पलटवार केलाय.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आर्थिक देवाण-घेवाणीचे आरोप केले आहेत. भाजपमधून जे लोकं ठाकरे गटात जातायत त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याच आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवर भाजपातून ठाकरे गटात आलेले नेते राजू शिंदे यांच्याकडून यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘रिक्षाचालवणाऱ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी विधानभवनात पाठवलं त्यावेळी त्यांच्याकडून पैसे घेतले होते का? आता उद्धव ठाकरे यांनी २०१४, २०१९ दोनदा तिकीट दिलं. उद्धव ठाकरे यांच्या नावावर आणि शिवसेनेच्या नावावर ते निवडून आलेत. त्यावेळी पैसे दिले होते का यांनी? 72 व्या मजल्यावर बसवलं, डिफेंडरमध्ये बसले त्यावेळी पैशे दिले होते का?’, असे सवाल राजू शिंदे यांनी केलेत. पुढे राजू शिंदे असेही म्हणाले, ‘त्यांची पैसे देण्याची औकातच नव्हती. औकातीपेक्षा जास्त भेटल्यानंतर माणूस औकात विसरतो.’, असे म्हणत राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

