Sanjay Raut Video : 'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवाला बाबा त्यांनी कुंभमेळ्यात नागा...', संजय राऊत यांचा खोचक टोला

Sanjay Raut Video : ‘शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवाला बाबा त्यांनी कुंभमेळ्यात नागा…’, संजय राऊत यांचा खोचक टोला

| Updated on: Jan 20, 2025 | 12:18 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी दरेगाव येथे गेले. दरम्यान, पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते दरेगावात गेल्याचे म्हटलं जात आहे.

आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दुपारी जातात, दिवसा जातात. त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कुणी चालवायचं मग? असा सवाल करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला. तर हा महाराष्ट्र तुमचे राग, लोभ, रुसवे-फुगवे यानुसार चालणार आहे का? तुमचे राग लोभ तुम्ही तुमच्यापाशी ठेवा पण तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा, असा सल्लाही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. पुढे ते असेही म्हणाले, एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. दरे हेचं त्यांचं दावोस आहे. त्यांनी खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. नागा साधूही अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात आपल्या तंबूत बसतात. जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रात आहेत या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यराज जींनी प्रयागराजमध्ये काही तंबू आणि साधूंची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रातील अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जायचं. गंगेत डुबकी घ्यायची. कुणी आयआयटीवाला बाबा आहे, कुणी दरेवाला बाबा असेल, असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केलाय. अस्वस्थ आहात तर महाराष्ट्राला का त्रास देता. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. जितके दिवस कुंभ आहे, तितके दिवस अस्वस्थ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी”, असा खोचक सल्लाही राऊतांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना दिला.

Published on: Jan 20, 2025 12:18 PM