Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनी ललित पाटीलच्या मृत्यूची व्यक्त केली भिती, म्हणाल्या एन्काऊंटर होणार?
VIDEO | ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवं नवे खुलासे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ललित पाटीलच्या जीवाला धोका तर ललित पाटीलचा संशयास्पद मृत्यू होऊ शकतो, अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
पुणे, २७ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवं नवे खुलासे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ललित पाटीलच्या जीवाला धोका असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ललित पाटीलचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो किंवा ललित पाटीलचा संशयास्पद मृत्यू होऊ शकतो, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी ललित पाटीलच्या मृत्यूची भिती व्यक्त केली आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ललित पाटीलचा एन्काऊंटर केला जाण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाचा तपास थांबवला जाऊ शकतो किंवा ललित पाटील आकस्मित मृत्यू होऊ शकतो, तर ललित पाटील यांच्या जीविताचं संरक्षण करणं आता मोठं आव्हान असणार आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..

