AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी

Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी

| Updated on: Jul 26, 2026 | 11:38 AM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोज जनाता पार्टीच्या (सीजेपी) कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं. यामध्ये त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागीतला होता. मंत्री धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोज जनाता पार्टीच्या (सीजेपी) कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं. यामध्ये त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागीतला होता. मंत्री धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली आहे. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या सभेच्या ठिकाणी अनेक तरुण दाखल झाले आहेत. इतकेच नाही तर काही जण कुटुंबासह येथे उपस्थित आहेत. यावेळी त्यांच्या हातात वेगवेगळे पोस्टर आहेत त्यावर विविध मिम्स आहेत. काही जोकदेखील आहेत.

या आंदोलनाची घोषणा करताना, “तरुणांनी देशाला ‘भीतीच्या वातावरणातून’ बाहेर काढले आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना आणि मनसे पक्षांनी आयोजित केलेली रविवारची सभा ही जल्लोष सभा म्हणून होणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती.

Published on: Jul 26, 2026 11:37 AM

Follow Us