Thane : 3 टर्म नगरसेवक अन् मतदार यादीतून नावच गायब! ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकासोबत काय घडलं?
ठाण्यातही ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचे नाव मतदार यादीतून वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. बघा नेमका काय आहे प्रकार?
ठाण्यातूनही मतदार यादीतील गोंधळाची बातमी आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि उत्तम नगरसेवक म्हणून परिचित असलेले सुधीर भगत यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. सुधीर भगत यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत, त्यांच्याच नावाच्या पण अलिबाग येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म सात भरून आपले नाव वगळण्यात आल्याचे म्हटले. मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे सांगत त्यांनी नाव पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील प्रारूप मतदार याद्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आदित्य ठाकरेंनी मतदार यादीत घोळ करून मुंबई जिंकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मतदार याद्यांमध्ये ‘चोरी’ केली जात असून, शहरांना लुटण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. यावर भाजपने आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

