Breaking | BJP सोमेश्वर परिवर्तन पॅनलला खातं उघडता आलं नाही, अजूनही 14 जागांचे निकाल बाकी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलची विजयाकडे घौडदौड सुरु आहे. या निवडणुकीचा निकाल काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी सोमेश्वर विकास पॅनलचे पाच पैकी दोन गटातील सात उमेदवार विजयी झाले आहेत.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलची विजयाकडे घौडदौड सुरु आहे. या निवडणुकीचा निकाल काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी सोमेश्वर विकास पॅनलचे पाच पैकी दोन गटातील सात उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे.

विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार, राष्ट्रवादीचा दावा 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पहिल्या आणि दुसऱ्या गटातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी गटात आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही गटांत सातपैकी सहा उमेदवार 15,000 पेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य असल्यामुळे विरोधी पॅनलचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI