Special Report | कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरीचा वाद चांगलाच तापला
कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरीचा(refinery in Konkan) वाद चांगलाच तापलाय. कारण ज्या गावात रिफायनरी होणार आहे. त्या बारसूच्या ग्रामस्थांनी आज माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे(Nilesh rane) यांचा ताफाच अडवला. धोपेश्वर रिफायनरीच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नेत्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला
मुंबई : कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरीचा(refinery in Konkan) वाद चांगलाच तापलाय. कारण ज्या गावात रिफायनरी होणार आहे. त्या बारसूच्या ग्रामस्थांनी आज माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे(Nilesh rane) यांचा ताफाच अडवला. धोपेश्वर रिफायनरीच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नेत्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. निलेश राणेंनी या ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. रिफायनरी प्रकल्पाचं सर्व राजकीय पक्षांनी समर्थन केलंय. पण काही ग्रामस्थांनी मात्र याला विरोध केलाय. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जमिन देणार नाही अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतलीय. रिफायनरीसाठी बारसू सोलगाव इथली 2400 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. नाट्ये गावात क्रूड ऑईल टर्मिनलसाठी जागेची चाचपणी करण्यात आलीय. माती आणि ड्रोन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रकल्पाची आखणीही सुरु झालीय. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला जिल्ह्यातील विविध 51 संघटनांनी पाठिंबा दिलाय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काॅग्रेस या पक्षांचाही रिफायनरीला पाठिंबा आहे. 4 हजार एकर जमिनीच्या मालकांनीही संमतीपत्र दिलंय. कोकणचे भूमिपूत्र असलेले नारायण राणे केंद्रात लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्री आहेत. रत्नागिरीचेच आमदार असलेल्या उदय सामंत यांना राज्यात उद्योग मंत्रीपद करण्यात आलंय. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी..एवढंच नव्हे तर खुद्द उद्धव ठाकरेही रिफायनरी व्हावी या मताचे आहेत. पण शिवसेनेचे खासदार असलेल्या विनायक राऊतांची भूमिका मात्र संभ्रम निर्माण करणारी आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पावेळी भाजप वगळता सर्वांचाच विरोध होता. पण आता परिस्थिती बदललीय. कुठल्याही राजकीय पक्षाचा याला विरोध राहिलेला नाहीए..पण काही ग्रामस्थ विरोध करतायत. त्यामुळं हे राजकीय पक्ष स्थानिकांची समजूत घालण्यात यशस्वी ठरतायत का. हेच पाहावं लागेल.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

