Mumbai | वाहतूक पोलिसाला कारचालकाने बोनेटवरुनच पुढे नेलं, अंधेरीतील धक्कादायक प्रकार
संबंधित घटना ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे कर्तव्यावर होते.
मुंबई : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात हा प्रकार घडला. गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलीस बोनेटवर चढला. तर चालकाने देखील संबंधित वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच चालत फरफटत पुढे नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पुढे काही स्थानिकांनी गाडी थांबवत बोनेटवरुन पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवलं. पण त्यानंतर कारचालक कार घेऊन पळून गेला. संबंधित घटना ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार तिथे आली. संबंधित कार चालकाने ही वीरा देसाई रोडकडून जेपी रोडच्या दिशेला उजवे वळण घेतली. पण तिथे त्या मार्गाला नो एन्ट्री होती. पण तरीही कार चालकाने त्या दिशेला गाडी वळवली. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस गुरव यांनी गाडी चालकाला अडवलं.
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
