विहिरीची रिंग पडल्यानं चार मजूर अडकले, बाहेर काढण्यासाठी शोधकार्य सुरु
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडीत शेतातील विहिरीची रिंग बांधकामक करताना कोसळल्याने चार मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची धक्कदायक माहिती घडली आहे.
पुणे, 03 ऑगस्ट 2023 | इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडीत शेतातील विहिरीची रिंग बांधकामक करताना कोसळल्याने चार मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची धक्कदायक माहिती घडली आहे. ही विहिर 127 फूट खोल आहे. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली असून, सहा पोकलेन मशीनच्या साहाय्याने माती व मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Published on: Aug 03, 2023 01:31 PM
Follow Us
Latest Videos
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
