Panjshir | पंचशीरमध्ये लढाईत तालिबानचे 800 दहशतवादी ठार
हेच कारण आहे की, तालिबानलाही पंजशीर खोऱ्याबद्दल चिंता वाटू लागलीय आणि त्यांनीसुद्धा बंदुकीचा भाषा करायला सुरुवात केलीय. आम्ही ताकदीने किंवा चर्चेद्वारे पंजशीरची समस्या सोडवू, असं तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम म्हणालेत.
अफगाणिस्तानमधील पंजशीर खोरे हा देशाचा एकमेव भाग आहे, जो तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान वेगाने तालिबानच्या नियंत्रणाखाली आला, पण तालिबानी दहशतवाद्यांनाना पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आलेला नाही. तसेच पंजशीर खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिले जात आहे. हेच कारण आहे की, तालिबानलाही पंजशीर खोऱ्याबद्दल चिंता वाटू लागलीय आणि त्यांनीसुद्धा बंदुकीचा भाषा करायला सुरुवात केलीय. मसूदच्या नेतृत्त्वाखाली सैनिक हे खोरे मिळवण्यासाठी युद्ध करत आहेत.
दुसरीकडे अफगाणिस्तान सैन्यही कडवी झुंज देत आहे. आतापर्यंत तब्बल 800 तालिबानी दहशतवाद्यांना या ठिकाणी ठार मारण्यात आलं आहे. हिंदुकुश पर्वतरांगांनी वेढलेले पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र आहे. अफगाण नेता अहमद शाह मसूदने सोव्हिएत-अफगाण युद्ध आणि तालिबानशी युद्धादरम्यान 2001 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत पंजशीर खोऱ्याचे संरक्षण केले. यामुळेच येथील लोकांनी पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतलीत.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

