Dada Bhuse | वाणिज्य मंत्र्यालयाने घेतलेला टोल पाठीमागे घ्यावा, दादा भुसेंची मागणी

शेतकरी आपल्या पिकाची नोंदणी सातबाऱ्यावर करू शकतात. अशी परिस्थीत झाली तर या मालावर प्रक्रिया करू असा आराखडा तयार आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, आठवड्याभरात परिस्थिती सुधारेल, असे दादा भुसे यांनी सांगितले.

मुंबई : केंद्र सरकारने जीएम सोयाबीन आयातीचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करावा. परदेशातील सोयाबीन आयातीचा केंद्राने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सोयाबीनचे पीक घेतले जाते. 2000 रूपये दर पडलेले आहेत, शेतकऱ्यांचे पीक आता काढणीला आले आहे त्यातच हा निर्णय त्यामुळे दर पडतील, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. मराठवाडा, विदर्भमध्ये सर्वांत जास्त सोयाबीनचे पीक घेतले जाते. शेतकरी आत्महत्या बाबत पूर्वीचे निकष आहेत तेच आहेत त्यात बदल केलेला नाही. नारायण राणे यांच्या अटकेबाबत कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही. टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे भाव कमी झालेत. आम्ही यावर लक्ष ठेऊन आहोत. ई पिक पाणी ही योजना सुरू आहे. शेतकरी आपल्या पिकाची नोंदणी सातबाऱ्यावर करू शकतात. अशी परिस्थीत झाली तर या मालावर प्रक्रिया करू असा आराखडा तयार आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, आठवड्याभरात परिस्थिती सुधारेल, असे दादा भुसे यांनी सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI