…तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये, सुषमा अंधारे यांचे आव्हान
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी दिला आहेत.त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता सुषमा अंधारे यांनीही आव्हान दिले आहे.
स्वर्गीय अजितदादांनी भोंदूगिरीला कधीच थारा दिला नाही. नाशिक भोंदूबाबा प्रकरणात त्यांच्या पक्षाच्या रुपाली चाकणकर काळीजादू, तंत्रमंत्र आणि अशा भोंदूगिरीत असेल तर ही पक्षाची प्रतिमा मलिन करणारी गोष्ट आहे. जर खरेच अजितदादांचा वारसा जपणारे हे लोक असतील तर तात्काळ चाकणकरचा प्रदेशाध्यक्ष पदावरुन सुद्धा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. आणि चाकणकरांना महिला प्रदेशाध्य पदावरुन दूर करणे होत नसेल तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा आम्ही वारसा जपणारे आहोत हे अजिबात सांगू नये असेही त्यांनी म्हटले आहे. मी चाकणकर यांची चिडचिड समजू शकते. एवढी चारशे-पाचशे कोटींची माया जमवलेली आहे. तटकरे वगैरे प्रभृतींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांनी चिडचिड न केली तर नवल, मी लहान माणूस आहे. सडाफटीक आहे. चळवळीतील कार्यकर्ती आहे.त्यांना काय करायचे आहे ते करु दे असे आव्हानही सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांना दिले आहे.
Published on: Mar 21, 2026 11:26 AM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

