Manikrao Kokate : कोकाटेंचं कृषी खातं जाणार? कोणाला मिळणार या खात्याची जबाबदारी? सूत्रांची मोठी माहिती
शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंनी केलं. तर विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढल्यानंतर हे खातं मकरंद पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं आहे. मात्र आता मकरंद पाटलांचं खातं माणिकराव कोकाटे यांना देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून न घेता त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना अभय देणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि व्हायरल होत असलेल्या रमी खेळतानाच्या व्हिडीओमुळे ते राज्यभऱात चर्चेत आहेत. तर विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. इतकंच नाहीतर कोकाटेंविरोधात राज्यभर आंदोलन होत असून त्यांच्या कृतीवरून संताप व्यक्त केला जात आहे.

